जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान संदीप सघुनाथ सावंत (२५ वर्ष) हे शहीद झाले आहेत. बुधवारी पहाटे नौशेरामध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.
फडणवीसांबद्दल मला सहानुभूती, जयंत पाटलांचा टोला
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असताना साताऱ्याचे जवान संदीप सावंत आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे शहीद झाले. संदीप सावंत हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी आहेत. संदीप सावंत यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नी सविता आहेत. संदीप यांना वीरमरण आल्याची माहिती कळताच मुंडे गावावर शोककळा परसरली आहे.
संग्राम थोपटेंचा योग्य वेळी सन्मान केला जाईल: बाळासाहेब थोरात