पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवाद्यांशी लढताना अमरावतीच्या सुपुत्राला वीरमरण

शहीद जवान पंजाब उईके

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अमरावतीच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. वरुण तालुक्यातील माणिकपूर गावचे रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना वीरमरण आले आहे. पंजाब उईके यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

देशाविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलची रवानगी पोलिस कोठडीत

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत पंजाब उईके यांना गोळी लागली आणि त्यांना वीरमरण आले. पंजाब उईके २००२ साली सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. नुकतीच त्यांची बदली जम्मू-काश्मीर येथे झाली होती.

जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले

पंजाब उईके यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच उईके कुटुंबियावर आणि माणिकपूर गावावर शोककळा पसरली आहे. पंजाब उईके यांच्या पाश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि तीन भाऊ असा परिवार आहे. पंजाब उईके यांचे पार्थिव बुधवारी रात्री वरुडला आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मनसेच्या ९ फेब्रुवारीच्या मोर्चाचा मार्ग ठरला