पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोली: जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटाप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट

गडचिरोलीतील जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटाच्या आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुरखेडा तालुक्यात १ मे २०१९ रोजी  जांभुळखेडा गावानजिक नक्षलवाद्यांनी मोठा भसुरुंगस्फोट घडवून आणला होता. या स्फोटामध्ये एका खासगी वाहन चालकासह गडचिरोली पोलिस दलाचे १५ जवान शहीद झाले होते. 

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली

जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटाप्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत गडचिरोली पोलिसांनी जलद गतीने तपास करत ८ मुख्य आरोपींना अटक केली होती. यामध्ये जहाल नक्षलवादी उप्पुगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का आणि तिचा पती सत्यनारायण ऊर्फ किरण यांच्यासह दिलीप श्रीराम हिडामी, परसराम मनिराम तुलावी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सिताराम हिडामी, सकरु रामसाय गोटा, कैलास प्रेमचंद रामचंदानी अशा ८ मुख्य आरोपींना अटक केली होती. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रती संसद सदस्यांकडे

जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध एनआयएनं आता दोषारोपपत्र दाखल केले आहे. एनआयएकडून याप्रकरणाचा तपास जलद गतीन सुरु आहे. 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर