पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावः महाजन-दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

जळगावः महाजन-दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

शिस्तप्रिय कार्यकर्त्यांचा पक्ष अशी भाजपची ओळख आहे. परंतु, जळगाव भाजपमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसून आले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, एकमेकांच्या अंगावर शाईफेक केली. कार्यकर्त्यांच्या या आक्रमकपणासमोर हे दोन्ही नेते हतबल झाल्याचे दिसून आले. रावसाहेब दानवेंनी तर व्यासपीठावरुन काढता पाय घेतला. भुसावळ अध्यक्ष निवडीवरुन कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्याचे सांगण्यात येते. 

जेएनयूत जाण्याच्या दीपिकाच्या कृतीला स्मृती इराणीनी दिले असे उत्तर

जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अचानक दोन गटाचे कार्यकर्ते व्यासपीठाकडे धावले आणि त्यांनी भुसावळ शहराध्यक्ष निवडीवेळी झालेल्या प्रकाराचा निषेध केला. परस्परविरोधात घोषणा देत त्यांनी शाईफेक केली. यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्ते इतके आक्रमक होते की ते महाजन यांनाही जुमानत नव्हते. 

गडचांदूर नगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता

हा सर्व प्रकार पाहून दानवे यांनी व्यासपीठावरुन काढता पाय घेतला. या गोंधळामागे भुसावळ शहराध्यक्षपदाची निवड असल्याचे सांगण्यात येते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jalgaon bjp party worker clashes with each other in front of girish mahajan and raosaheb danve