पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी

राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. या सभे दरम्यान कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील याचे गट आमने-सामने आले. सभे दरम्यान सतेज पाटील यांच्या गटाकडून पत्रकं भिरकवण्यात आली. तर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन पाटील

महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाचे पडसाद या सभे दरम्यान पहायला मिळाले. आज कसबा बावडा येथील कारखान्याच्या कार्यस्थळावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभा सुरु होताच महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभास्थळी गोंधळ उडाला. यावेळी सतेज पाटील यांच्या गटाने पत्रकं देखील भिरकावली. 

वाहतूक नियम; दंड आकारणी सरकारची महसूल उत्पन्न स्किम

मागच्या वर्षी देखील ३४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी अशाच पध्दतीने गोंधळ घातला होता. ऐवढेच नाही तर ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. तर २०१७ च्या सभे दरम्यान देखील राडा झाला होता. सभे दरम्यान सभासदांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या फेकल्या होत्या. 

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट