पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा दुर्देवी मृत्यू

ढिगाऱ्याखाली दबून मजुरांचा मृत्यू

नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूरच्या कन्हान येथे अवैध माती उत्खनन सुरु होते. त्याठिकाणी ही घटना घडली आहे. उत्खननाचे काम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन मजूर दबून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. कन्हैय्या हरजन, गंगा जलहारे आणि शिवकुमार मनहारे अशी मृत मजुरांची नावं आहेत. 

खूशखबर; SBI कडून IMPS, NEFT आणि RTGS निशूल्क

नागपूरातल्या कन्हान भागातील वेकोली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध माती उत्खनन सुरू होते. कन्हैय्या, गंगा आणि शिवकुमार हे मजूर आज नेहमीप्रमाणे कामावर आले. त्यांनी टॅक्टरमध्ये माती भरली. त्यानंतर २० ते २५ फूट उंच मातीच्या खड्ड्यामध्ये ते बसले होते. गेल्या काही दिवसापासून नापूरात पाऊस पडत आहे. पावसामुळे मातीचा ढिगारा खचला आणि या तीन मजुरांच्या अंगावर माती पडली. या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला. 

ICC WC 2019: विराट-शास्त्रींना करावा लागेल CoA च्या बाउन्सरचा सामना

या घटनेमुळे कन्हान भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांमधील रोष बघता वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी मृत मजुरांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. 

बिहारमध्ये जदयू नेत्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या