पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योगासने हाच निरोगी जीवनाचा मंत्र - देवेंद्र फडणवीस

योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगासनांना अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगविद्येच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये केले.

नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड उपस्थित होते.

अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील १५० पेक्षा अधिक देशांत सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत.  

जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती रामदेव बाबांना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना मोठा आनंद झाला. रामदेवबाबा या राज्यस्तरीय शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप आभार, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून, आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योगविद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हावासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमित योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.

मुंबईत लोकलचा प्रवास महागणार, पण...

नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.