पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये महिला डॉक्टरचे रॅगिंग; १५ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

पालघर एम एल ढवळे हॉस्पिटल

पालघरमध्ये महिला डॉक्टरसोबत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघर शहरातील एम. एल. ढवळे ट्रस्टच्या रूग्णालयात हा प्रकार घडला आहे. महिला डॉक्टरचा मानसिक छळ केल्याप्रकरणी १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रजत शर्मांनी DDCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

पालघरमधील एम. एल. ढवळे रुग्णालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत घडलेल्या या प्रकरामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या १५ वरिष्ठ डॉक्टरांनी तिचा मानसिक छळ करून मानसिक इजा पोहोचवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पालघर पोलीस ठाण्यात या महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीनंतर डॉक्टरांविरोधात रॅगिंग प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

चंद्रपूरमध्ये भाजपकडून हालचालींना वेग; नगरसेवकांना सहलीवर..

दरम्यान, महिला डॉक्टर आपले शिक्षण पूर्ण करुन ढवळे रुग्णालयात प्रशिक्षण अनुभव घेण्यासाठी दोन ते तीन दिवसापूर्वी रुजू झाली होती. प्रशिक्षण घेत असताना गुरुवारी रात्री वरिष्ठ डॉक्टरांनी गुरुवारी रात्री तिचा छळ केला यामुळे तिचा मानसिक त्रास झाला. त्यानंतर या महिला डॉक्टरांनी त्रास देणाऱ्या १५ डॉक्टरांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

बिहारमध्ये बॉयलरचा स्फोट; चौघांचा मृत्यू