पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी 'असे' वक्तव्य केलेच नाही; इंदोरीकर महाराजांचा खुलासा

इंदुरीकर महाराज

मुला-मुलींच्या जन्मावरुन केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांना अहमदनगर जिल्हा चिकित्सक विभागाने नोटीस पाठवली होती. या नोटीसला शेवटच्या दिवशी इंदोरीकर माहराजांनी पत्राद्वारे लेखी उत्तर दिले होते. यामध्ये इंदोरीकर महाराजांनी 'मी ते वक्तव्य केलेच नाही आणि मी असे कीर्तन केलेच नाही, असा खुलासा केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण आले आहे. अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. 

'हाऊडी मोदी' प्रमाणे 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाची लगबग!

डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले की, 'इंदोरीकर महाराजांनी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की ज्या तारखेचा उल्लेख नोटीसमध्ये केला आहे. त्या तारखेला कीर्तन झालेच नाही. तसंच, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात कीर्तन केलेच नाही. मी समाज प्रबोधन करत आहे. सरकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत. यू ट्यूबला कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप आम्ही टाकत नाही. तसेच रेकॉर्डिंग देखील करत नाही, असे इंदोरीकर महाराजांनी म्हटले आहे. 

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त

दरम्यान, मुंबईतील एका वृत्तपत्रात इंदोरीकर महाराजांच्या त्या वक्तव्यासंदर्भात बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या वर्तमानपत्रास पत्र पाठवून कोणत्या आधारे ही बातमी दिली. याचा खुलासा मागवण्यात आला आहे, असे देखील डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. तर, इंदोरीकर महाराज यांनी  मंगळवारी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे इंदोरीकर महाराजांनी लेखी पत्रात म्हटले होते. 

कोणता सर्जिकल स्ट्राईक केला?, कमलनाथांचा भाजपला सवाल