पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास; इंदोरीकर महाराजांची दिलगिरी

इंदुरीकर महाराज

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसांनंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि माता-भगिनींना या सर्वांना उद्देशून लेखी पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे इंदोरीकर महाराजांनी सांगितले. 

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; पवारांचे फडणवीसांना आव्हान

इंदोरीकर महाराज यांनी माफीनाम्यात असे म्हटले आहे की, 'आज गत आठ दिवसांपासून माझ्या किर्तनरुपी सेवेतील ज्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर 'समाजमाध्यमांत' माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, आंध्रश्रध्दा निर्मुलन विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत माझ्यावरील प्रेम वृध्दिगत व्हावे ही सदिच्छा, असंही इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे. 

ब्रिटिश खासदाराला परत पाठवले, काँग्रेस नेत्याने केले समर्थन

दरम्यान, इंदोरीकर महाराजांच्या या वक्तव्यामुळे तो मोठ्या वादात सापडले होते. ओझर येथे झालेल्या एका कीर्तना दरम्यान इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महिला संघटनांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर, चार दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी मला खूप मनस्ताप झाला आहे. माझी सहन करायची कॅपिसिटी संपली आहे. मी जे काही बोललो ते चुकीचे नाही. हे सर्व आधीच ग्रंथात लिहिले आहे. पण मी आता वेगळ्या निर्णयाप्रत आलो आहे. हे एक-दोन दिवस पाहीन नाही तर मी कीर्तन सोडून शेती करायला घेईन, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले होते.  

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'