पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदोरीकर महाराजांचा कोल्हापूरातील किर्तनाचा कार्यक्रम रद्द

इंदुरीकर महाराज

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेला इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. वेळे अभागी कार्यक्रम रद्द करत असल्याचे कारण आयोजकांनी दिले आहेत. तसंच, कोणाच्या दबावाला बळी पडून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला नसल्याचे आयोजनकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाला अंधश्रध्दा निर्मल समितीसह अनेक पुरोगामी संघटनांनी विरोध केला होता. 

 

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा; छगन भुजबळांची मागणी

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठामध्ये इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमस्थळी वेळेत पोहचणे शक्य नसल्याने त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र तीन महिन्यानंतर पुन्हा इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजनकांनी सांगितले. तर, पुरोगामी संघटनांचा विरोध पाहता वाद टाळण्यासाठी इंदोरीकरांच्या किर्तनाचा कार्यक्रम रद्द केला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 

श्रीपाद छिंदमला सरकारचा दणका; नगरसेवक पद केले रद्द

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शिवमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला इंदोरीकर महाराज उपस्थित राहणार होते. यावेळी इंदोरीकर महाराज कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या किर्तनाला अंनिससह पुरोगामी संघटनांनी विरोध केला. इंदोरीकरांना कोल्हापुरात येऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका अंनिस कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण होते. 

दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते?; शिवसेनेचा सवाल