पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'त्या' कीर्तनाचा व्हिडीओ यूट्यूबवर नाही; इंदोरीकरांना सायबर सेलकडून दिलासा

इंदुरीकर महाराज

मुला-मुलींच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाजारांना सायबर सेलकडून दिलासा मिळाला असून त्यांच्या वादग्रस्त कीर्तनाचा व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध नसल्याचा खुलासा सायबर सेलकडून करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया पीसीपीएनडीटी समितीचे सचिव प्रदीप मुरंबिकर यांनी दिली आहे.  

...तर कर्जमाफी द्यायला ४०० महिने लागतील: फडणवीस

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना अहमदनगर जिल्हा चिकित्सक विभागाने नोटीस पाठवली होती. या नोटीसला इंदोरीकर माहराजांनी पत्राद्वारे लेखी उत्तर दिले होते. त्यामध्ये इंदोरीकर महाराजांनी 'मी ते वक्तव्य केलेच नाही आणि मी असे कीर्तन केलेच नाही, असा खुलासा केला आहे. तसंच,  जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात मी कीर्तन केलेच नाही, असे या पत्रात इंदोरीकारांनी सांगितले होते. 

सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायमूर्तींना स्वाइन प्लूची लागण

यापूर्वी, इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे इंदोरीकर महाराजांनी लेखी पत्रामध्ये म्हटले होते. तर,  अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महिला संघटनांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

लोअर परेलमध्ये डंपरने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू