कीर्तनातील वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कार्यक्रमातून दुखावलेल्या प्रत्येकाची जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले की, कीर्तनाच्या माध्मातून मी कोणत्याही वर्गावर जाणीवपूर्वक किंवा ठराविक उद्देश ठेवून एखादे विधान करत नाही. तरीही अनावधानाने माझ्या तोंडून निघालेल्या विधानाने कोणी दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो. माझ्या काही वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निर्भया प्रकरणः दोषी मुकेशची पुन्हा एकदा न्यायालयात धाव
मुला-मुलींच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज वादात सापडले होते. त्यानंतर इंदोरीकर महाराजांवर चर्मकार समाजाचा अवमान केल्याचा आरोप झाला. यासंदर्भात चर्मकार समाज आणि बहुजन आघाडीने मुंबईतील वर्तकनगर पोलिसात त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
अंकित शर्मा हत्या प्रकरणः ताहिर हुसनेला
इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनामध्ये अनेकदा महिलांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. यापूर्वीही अनेकदा त्यांच्यावर यासंदर्भात टीकाही झाली आहे. त्या तमाम महिलांची आणि मुलींचा उल्लेख करत त्यांनी माफी मागितली आहे. कोणाला दुखवण्यासाठी मी कीर्तन करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधातील वादात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. इंदोरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात महिलांची माफी मागायला हवी, असे त्यांनी म्हटले होते.