पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं. मात्र अल्पावधित त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. माझ्या बीडमधील भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत. मी इंदिरा गांधीचा समर्थक आहे. त्यांच्याविषयी मला आदर आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे असं सांगत त्यांनी युटर्न घेण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई : दहिसरमध्ये कोरोनाचा संशयित

बीडमध्ये बुधवारी 'संविधान बचाव' महासभा झाली, यावेळी बोलताना आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादमधून  सर्वप्रथम उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असेही ते म्हणाले. 

चीनमध्ये अडकलेल्या ३०० भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलविणार

या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर जितेंद्र आव्हाड ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. ''इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ पास ही पोहचू शकत नाही' असं लिहित आव्हाड यांनी स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

काय म्हणाले आव्हाड
माझ्या बीडमधील भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत. इंदिरा गांधींबद्दल मला आदर आहे. माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष नाही तर गांधीजींची लोकचळवळ आहे. इंदिरा गांधी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मात्र  १९७५ ते ७७ या काळात त्यांच्या भूमिकेमुळे लोकशाहीवर गदा येतेय असं इथल्या जनतेला वाटू लागलं. काही जण त्यांच्या बाजूनं होते तर काही विरोधात होते. 

लोकशाहीच्या मुलभूत अधिकारांवर जेव्हा गदा आणली जाते तेव्हा जनता पेटून उठते. १९७७ साली इंदिराजींचा पराभव झाला, त्यांचा पराभव होऊ शकतो तर मोदी आणि शहांचाही होऊ शकतो. मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे. मला हे सांगायला लाज वाटत नाही मात्र इंदिरा गांधींची तुलना मोदी- शहांशी होऊ शकत नाही नाही, असं आव्हाडांनी स्पष्ट केलं. 

जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले बक्षीस