पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरवरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानात बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास

इंडिगो विमान

नागपूरवरुन दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते रद्द करण्यात आले. या विमानातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रवास करत होते. इंडिगो विमान 6E 636 आज सकाळी नागपूरवरुन दिल्लीला जाण्यासाठी धावपट्टीवर उतरले मात्र अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान थांबवले. या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. कोणालाही काही इजा झाली नाही.

दिल्लीः IGI विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाला अटक

दिल्लीमध्ये मंगळवारी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्गावर असलेल्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नितीन गडकरींना बैठकीला उपस्थित राहणे कठीण झाले आहे. 

घुसखोरीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी दाखल

असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या परिस्थितीवर देखील ते बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचेच नियोजन करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

'मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासनाला गती आली