पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताला बुद्ध नव्हे संभाजी महाराज पाहिजेतः संभाजी भिडे

संभाजी भिडे गुरुजी

आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात अडकणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्यूस्टन येथील भाषणावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे चुकीचे बोलले असून देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असे ते म्हणाले. 

चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरजः मोदी

नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो. ते काम आपले आहे. देशाने जगाला बुद्ध दिला. पण बुद्धाचा उपयोग नाही. विश्वाचा संसार चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत.

VIDEO: मोदींनी जिंकलं मन, प्रोटोकॉल तोडून केलं 'हे' काम

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर निशाणा साधताना बुद्धांचा उल्लेख केला होता. भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला असल्याचे त्यांनी म्हटले होते.