पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये ४ इंग्लिश शाळांवर आयकर विभागाचे छापे

इंग्लिश शाळांवर आयकर विभागाचे छापे

औरंगाबाद शहरातील चार इंग्लिश शाळांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या शाळांचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असतानाही आयकर विवरण पत्र न भरल्यामुळे आयकर विभागाने छापे टाकले आहेत. पीएसबीए इंग्लिश शाळा, ऑर्किड इंटरनॅशनल शाळा, रॉयल ऑक्स शाळा, ऑईस्टर इंग्लिश शाळा या शाळांवर आयकर विभागाने छापे टाकले. दरम्यान या शाळांवर छापे टाकल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. 

अयोध्या खटला : मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश

खासगी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने छापे टाकलेल्या या शाळांची वार्षिक उलाढाल ४ ते ५ कोटी रुपयांची असताना देखील शाळेचे संस्थाचालक आयकर विवरणपत्र भरत नव्हते. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या शाळंच्या कारभारावर आयकर विभागाचे लक्ष होते. या चार ही शाळा आयकर विभागाचे विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी छापेमारीची कारवाई केली. आयकर विभागाचे ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ४ पथकांनी एकाच वेळी या शाळांवर छापे टाकले. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. 

लग्नसोहळ्यावर काळाचा घाला; भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले

आयकर विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान या चार ही शाळांच्या कार्यालयातील कागदपत्रे, बँक खाते यांची कसून तपासणी करण्यात आली. त्याचसोबत शाळेमध्ये असणारी विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फी आणि देणगी यासंदर्भात सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, या शाळांबाबत अनेक तक्रारी देखील समोर आल्या होत्या. शाळा जास्त फी घेते त्याचसोबत देणगी देखील जास्त घेते अशा तक्रारी होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाचे या शाळांवर लक्ष होते. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे.

नागपूर महामेट्रो डेटा लीक प्रकरणात दोन जणांना अटक