पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा

हसन मुश्रीम यांच्या घरावर छापा

कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. आज पहाटे प्राप्तिकर विभागाची टीम कागल येथे दाखल झाली. पोलीस बंदोबस्तात प्राप्तिकर विभागाची टीम मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. 

केंद्रात मोठे प्रशासकीय फेरबदल, भल्ला गृह विभागात ओएसडी

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर देखील छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहे. त्यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.  

CSMT ते ठाणे मार्गावर लवकरच भूमिगत लोकलची शक्यता