चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाने छापे टाकले आहे. कोळसा चोरी प्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याप्रकरणीच आयकर विभागाने आज कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. या कारवाईमुळे कोळसा क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमध्ये अकबर एक्स्प्रेसला अपघात; १० ठार तर ६४ जखमी
चंद्रपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील कोळसा खाणीतून कोळसा चोरी केली जातो. दरम्यान भद्रावतीलगत असणाऱ्या एका खासगी कोळसा खाणीतून देखील कोळसा चोरी झाला होता. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याप्रकरणी अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयकर विभागाने आज थेट कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालयावर आणि कोळसा खाणीवर छापे टाकले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; वैद्यकीय प्रवेशात
आज सकाळी आठ वाजल्यापासून आयकर विभागाने ही कारवाई सुरु केली. एकाच वेळी आयकर विभागाच्या ८ ते ९ पथकाने छापे टाकले. चंद्रपूर शहरातील शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालयवर आयकर विभागाने छापे टाकले. तसंच चंद्रपूरातील नागाळा कोळसा डेपो आणि ताडाळी येथील विमला रेल्वे सायडिंगवर देखील छापे टाकण्यात आले. छापेमारी करत आयकर विभागाकडून या कोळसा व्यापाऱ्यांची चौकशी सुरु आहे. या छापेमारीमुळे कोळसा चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.