पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ वर, सारीचे रुग्णही आढळले

कोरोना विषाणू

सोलापूर शहरात सोमवारी नवे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या नवीन सहा रुग्णांसह सोलापुरातील कोरोना विषाणूबाधितांचा आकडा २१ वर पोहोचला आहे. यात दोन मृतांचाही समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

रविवारपर्यंत सोलापुरात २ मृत्यू आणि १३ जणांवर उपचार अशी एकूण कोरोना बाधितांची संख्या १५ होती. त्यात आज ६ रुग्णांची भर पडली. सोमवारी शहरातील बापूजी नगर, भद्रावती पेठ येथील प्रत्येकी एक तर कुर्बान हुसेन झोपडपट्टी तसेच पाच्छा पेठ येथील दोन रुग्ण आढळून आले. यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. आज नव्याने भर पडलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन रुग्ण हे सारी आजाराशी निगडित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.

पालघरमध्ये चोर समजून तिघांची हत्या केल्यावरून ११० जणांना अटक

आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना संशयित ७७८ जणांची चाचणी घेण्यात आली. ५६९ जणांचे अहवाल आले आहेत तर २०९ जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. प्राप्त ५६९ पैकी ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर २१ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

सोलापुरात आज दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू झाले आहेत. अत्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आता २३ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. यात किराणा दुकान, खासगी औषध दुकान, बँका, भाजीपाला यांचाही समावेश आहे.

बंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही