सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीतील सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करून त्यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून साताराचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. यामुळे उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर बोलावून आपल्याला बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
कोरोना विषाणू : महाराष्ट्रात सहा संशयित रुग्ण
याप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. याप्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून गेले होते.