पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतदानाला जाताय मग हे नक्की वाचा

चौथ्या टप्प्यात राज्यात ५७ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक नागरिकांने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाला जाण्यापूर्वी काय बघणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे, याची माहिती खाली दिली आहे. ती शांतपणे वाचून मगच मतदानाला गेल्यास कोणत्याही त्रासाविना सुरळीतपणे तुम्हाला मतदान करता येईल.

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

मतदान केंद्रांची माहिती अशी मिळवा
आपले मतदान नक्की कुठल्या मतदान केंद्रावर आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय किंवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील ११ प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. या ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल.
१. पासपोर्ट (पारपत्र)
२. वाहन चालक परवाना
३. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
४. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
५. पॅनकार्ड 
६. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
७. मनरेगा जॉबकार्ड
८. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
१०. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड

आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार

मतदारांच्या सुविधेसाठी
आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-१९५०’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ही सुरु
दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा