पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर त्याचं पाप फडणवीस सरकारचं: अजित पवार

अजित पवार

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी युती सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सरकारवर टीका केली. दुष्काळग्रस्त बळीराजाला कर्जमाफी देणे सोडाच, उलट पुनर्गठीत कर्जावर १२-१३% दराने व्याज आकारून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आत्महत्या वाढल्या तर त्याचे पापही या सरकारचेच असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ६ महिन्यांपूर्वी १९१ तालुके दुष्काळी होते पण छावण्या एप्रिलमध्ये सुरू केल्या, यातून सरकारची नियोजनशून्यता दिसून येते असा आरोपही त्यांनी केला. 

मंत्रिमंडळ विस्तार करताना वगळण्यात आलेल्या मंत्र्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, मागासवर्गीय-आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या चार नेत्यांना या सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशिष्ट लोकांचेच प्रतिनिधित्व करणारे हे सरकार आहे. गरीब आणि वंचितांवर हा अन्याय का? त्याचे कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांना फोडण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. लोकशाहीत हे योग्य आहे का? असं वागून कुठल्या मार्गाने हे लोक लोकशाही घेऊन जात आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे; परंतु यालाच गालबोट लावण्याचे काम हे सरकार करत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:If the farmers suicide increases then their sin is in the name of Fadnavis government says ncp leader ajit pawar