कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पुराची हवाई पाहणी केली. सर्वांत भीषण परिस्थितीही सांगलीची असून तिथे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागरिकांना पाण्यातून बाहरे काढण्यासाठी पुऱेशा बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. बोटींची संख्या वाढवण्यात येत आहे. जेव्हा कोणताच पर्याय उरत नाही, तेव्हा एअर लिफ्टिंगचा वापर करण्यात येणार आहे. एअर लिफ्टिंग करताना लोक प्रशिक्षित नसतात, त्यामुळे त्यांना एअर लिफ्टिंगच्या वेळी अडचणीचा सामना करावा लागतो, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका
- ओडिशा, पंजाब, गोवा, गुजरातमधील पथके मदतीसाठी बोलावली आहेत.
- हवामान खराब असल्याने आणि हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय नसल्याने आम्हाला सांगली आणि कराडला जाण्याची परवानगी नाकारली.
- सांगलीतील स्थिती सर्वाधिक भीषण
- आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे गंभीर परिस्थिती
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आलमट्टी धरणातून ५ लाख क्यूसेक पाणी सोडणार असल्याचे सांगितले.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis visited Shivaji Nagar area in Kolhapur to review rescue & relief operations. CM also met flood-affected people staying at Kalyani Hall in Kolhapur, today. #Maharashtra pic.twitter.com/KuyBnBnXsx
— ANI (@ANI) August 8, 2019
- आलमट्टीमधून पाणी सोडल्यास सांगलीतील पाणी आजच मोठ्याप्रमाणात कमी होईल.
- कोल्हापुरातील २२३ गावे पुरामुळे बाधित
- कोल्हापूरः १८ गावांना पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले आहे.
- कोल्हापूरः ३८१३ घरांचे नुकसान
- कोल्हापूरः ४ जणांचा मृत्यू
- मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
- विविध ठिकाणी नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- सध्या ६० बोटी काम करत आहेत
- तटरक्षक दलाची २ पथके पोहोचली आहेत.
- ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान