कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अलमट्टी धरणाची उंची आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थितीकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
रामदास आठवलेंकडून पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत
हेलिकॉप्टर केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वापरली गेले. मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासन गतिमान झाले असते. केरळ सरकारने नागरिकांच्या सुटकेसाठी मच्छीमारांचा वापर केला होता, तशी कल्पकता फडणवीस सरकारला दाखवता आली नाही, असे आंबेडकर म्हणाले.
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाणी ओसरण्यास काही दिवस लागणार आहेत. महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याची मदत करावी. वंचित आघाडी मुंबई, कोल्हापूर, सांगलीत मदतीसाठी संकलन केंद्र उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.