पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ, आमदाराचा दावा

टोल नाक्याचे संग्रहित छायाचित्र

भाजपचे ओळखपत्र असलेले कार्यकर्ते व नेत्यांना टोल आकारला जात नाही, असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानेच हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हाळवणकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हाळवणकर यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

जयकुमार गोरेंना पाडा, सर्वपक्षीय बैठकीत निर्धार

हाळवणकर हे मिरज येथे पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपच्या ओळखपत्रावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस यांची छायाचित्रे असल्याने कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी होत नाही, असा दावा करताना हे कायदेशीर नाही, याची माहिती आहे. मात्र, टोल कर्मचारी महसूलमंत्र्यांचा फोटो पाहून वाहनांना माफी देतात, असे त्यांनीच सांगितले.

भाजपचाच मुख्यमंत्री होणार, सरोज पांडेंची पुन्हा युतीवर ठिणगी

सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजकीय दबाव असल्याने टोलवरील कर्मचारी घाबरतात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना टोलमाफी मिळते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार हाळवणकर यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. परवापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर टोल भरायचा नाही, घोषणा द्या, चंद्रकांत पाटील जिंदाबाद, असे टि्वट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे आणखी चार आमदार भाजप-शिवसेनेच्या वाटेवर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:if bjp party worker show bjps membership identity card then they did not need to pay toll on toll plaza says bjp mla suresh halvankar