पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान

वरळी पोलिस वसाहत

राज्यातील पोलिस दल कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण झाल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 

लॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. राज्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषतः मुंबईमध्ये रुग्ण सापडण्याची संख्या जास्त आहे. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत.