पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना तपासणी करायची आहे?, मग या लॅब्जमध्ये जा...

कोरोना

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील २७ खासगी प्रयोगशाळांना (लॅब) कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे ८ लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या खासगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने ‘कोरोना तपासणी केंद्र’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे केली होती, असे त्यांनी सांगितले.

कर्जावरील व्याजदरात कपात, आरबीआयचे गव्हर्नर दास यांची घोषणा

थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबोरेटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण २ हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

व्वा! शनिवारपासून दूरदर्शनवर 'रामायण' मालिकेचे पुनर्प्रक्षेपण

या तपासणीसाठी रुग्णाला डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे. यामध्ये दोन प्रकारच्या चाचण्या आहेत. एक स्क्रिनिंग आणि दुसरे कन्फर्मेशन. या दोन्ही चाचण्यांसाठी केंद्र सरकारने ४५०० रुपये इतके शुल्क आकारून दिले आहे. एका दिवसात केवळ ६० चाचण्याच करण्याचे निर्देश या लॅबना देण्यात आले आहेत.