पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा तर होणारच!

तुकाराम मुंढे आणि अश्विनी भिडे

आरे कारशेड च्या मुद्यावरुन शिवसेनेसोबत पंगा घेतलेल्या मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या संचालिका अश्विनी भिडे यांचा कार्यभार हा रणजितसिंह देओल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कारशेडच्या मुद्यावरुन अश्विनी भिडे चक्क विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर त्यांची बदली होणार अशी चर्चा सुरु असताना ठाकरे सरकारने त्यांना बढती दिली होती.

CM ठाकरे म्हणाले, 'तान्हाजी' चित्रपट नक्की बघेन, पण...

अश्विनी भिडे यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपुष्टात आला होता. त्यांना मुदतवाढ दिली जाऊ शकत होती. मात्र ठाकरे सरकारने त्यांच्या जागी रणजितसिंह देओल यांची नियुक्ती केली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये घेतलेल्या आणखी एका बदलीची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांची या ठिकाणी बदली झाल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. 

'वाडिया रुग्णालयाचा निधी मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या मनपात तुकाराम मुंढेंना मुद्दाम आणलं का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी २००८ मध्ये तुकाराम मुंढे यांनी नागपूर जिल्हा परिषदेवर सीईओचा कार्यभार पाहिला आहे. त्यावेळी त्यांनी पदभार स्वीकारताच गैरहजर शिक्षकांना तर वैद्यकीय कारभारात अनियमिततेबाबत काही डॉक्टरांनाही निलंबित केलं होत. तुकाराम मुंढे यांची पुण्यातील कारकिर्दही चांगलीच गाजली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ias tukaram mundhe transfer nagpur municipal corporation commissioner ashwini bhide removed from mmrcl metro 3