पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'IAS महिला अधिकाऱ्याच्या 'त्या' ट्विटवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी'

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आयएएस महिला अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या विशेष उपायुक्त आणि सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन महात्मा गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त ट्विट केले होते.   

मुंबईः पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी

महात्मा गांधींचा फोटो नोटांवरुन काढून टाकण्याची वेळ आली आहे असे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी महात्मा गांधींचे पुतळे पाडा आणि थँक्यू गोडसे…अशा शब्दांचा उल्लेख केला होता.  या ट्विटमुळे वाद निर्माण झाल्यानंतर  चौधरी यांनी आपलं ट्विट डिलीट केलं होते. ट्विटचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारवही त्यांनी केली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निधी चौधरी यांची  सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही आपली भूमिका मांडली आहे. 

नथुराम गोडसे वक्तव्य : कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महिला अधिकाऱ्याने केलेले ट्विट निंदणीय असल्याचे म्हटले आहे. यातून त्यांच्या विचाराची पातळी लक्षात येते. अशा प्रकारचे विचार रोखण्याची गरज आहे. चव्हाण म्हणाले की, सरकारने या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी. सरकार संबंधित महिला अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार यावरुन सरकारची विचारधारा लक्षात येईल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.