ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता बळीराजा सोने पिकवतो. पण या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती आपल्या राज्याचे वैभव नाही. जेव्हा पाहिजे असतो, तेव्हा हा पाऊस पडत नाही. जेव्हा नको असतो तेव्हा तो थांबत नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समोर ते बोलत होते. अवकाळीग्रस्तांसाठी केलेली १० हजार कोटींची मदत पुरेसी नाही हे मला आणि सरकारलाही माहीत आहे, असे म्हणत त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आपली ताकद पणाला लावू असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवतीर्थावर शपथ घेणारः राऊत
Maharashtra: Shiv Sena chief Uddhav Thackeray met farmers who suffered losses due to heavy rains, in Aurangabad district, today. https://t.co/fsSFAN6LFd pic.twitter.com/YYgCDh5db6
— ANI (@ANI) November 3, 2019
ते पुढे म्हणाले, मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. १० हजार कोटी पुरेसे नाहीत, याची मला आणि सरकारलाही जाणीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या जनतेनेही मतरुपी आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे त्यांनी ही मदत द्यायलाच हवी.
विमा नसलेल्यांनाही मदत मिळणारः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत म्हटले की, कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही आम्हाला मत देताना आमचा आधार कार्ड, बँक स्टेटमेंट विचारले नव्हते. मग तुमच्या मदतीच्यावेळी हे नियम नसले पाहिजेत. तुमच्यासाठी मी ताकद पणाला लावेन. आत्महत्येचा विचार करु नका. माझा शेतकरी मर्द असल्याचेही ते म्हणाले.