पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजपासून मी BJP च्या कोअर कमिटीची सदस्य नाही : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पराभव वैगेरे चिल्लर गोष्टीनं खचणार नाही, मात्र गेल्या काही दिवसांत १५ वर्षांच्या राजकीय प्रवासातील वाईट अनुभव आला. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कोअर कमिटीपासून मुक्त होण्याची घोषणा केली. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. 

गोपीनाथ मुंडे असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो: एकनाथ खडसे

पंकजा यांनी कोअर कमिटीतून मुक्त होण्याची घोषणा केली असली तरी पक्षात कायम राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पक्ष कुणाच्या बापाचा नाही माझ्या बापाचा आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना टोला लगावला. विधानसभा निवडणुकीच्या काळात शेवटच्या दिवसांपर्यंत फडणवीसांसाठी प्रचार केला. मग मी बंड करणार असल्याची अफवा कोणी पसरली? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या बोलण्याचा रोख हा माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होता. 

न्याय मिळेल पण बोलण्यातून जखमा करू नका - चंद्रकांत पाटील

पक्ष कोणाचाही नसतो पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ही मी पक्षाचा असे म्हणतील. सध्याच्या घडीला बंडखोर नेत्यांची गरज आहे. गप्प राहणाऱ्या नेत्यांची नाही. कोणतेही पद नसले तरी मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन. २७ जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:I dont want any post of party dont want to be member of the core committee says Pankaja Munde gopinath munde birth anniversary