पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांच्या त्या शपथविधीनंतर 'शॉक' बसलाः पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे

अजित पवारांबरोबर भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्याचे पाहून मला आनंद झाला नव्हता. तेव्हा मला 'शॉक' बसला होता, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या 'एबीपी माझा'शी बोलत होत्या. मी कोअर कमिटीत असले तरी मला शपथविधीबाबत काहीच माहिती नव्हते हेही त्यांनी स्पष्ट केले. पण मी त्यावेळी फडणवीस यांच्या अभिनंदनाचे टि्वट केले, हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. त्याचबरोबर फडणवीस यांनी जरी मला बहीण म्हटले असले तरी मी त्यांना मित्र मानते, असे त्या म्हणाल्या. 

मी नेहमीच पंकजा यांच्या पाठिशी उभा राहिलोः देवेंद्र फडणवीस

त्या म्हणाल्या मी अजिबात तणावात नाही पण अस्वस्थ आहे. माझ्या टि्वटर हँडलवर कधीच कमळ चिन्ह नव्हते. त्यामुळे ते हटवण्याचा काही संबंधच नाही. दि. १ ते १२ डिसेंबरदरम्यान ज्या घटना घडल्या, पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या उठल्यामुळे मी अस्वस्थ झाले. 

मी पॉवर गेम खेळते, असे वातावरण निर्माण करण्यात आले. कमी दिवसांत खूप बघायला मिळाले. माझ्या अस्वस्थतेचे कारण वेगळेच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असताना मी पक्ष का सोडेन, असा सवाल त्यांनी केला. 

खडसेंनी जाहीर बोलणं टाळायला हवं होतं- फडणवीस

बंड करण्यासाठी मला काहीही कारण नाही. मला पुन्हा शून्यावर येऊन काम करायचे आहे. त्यामुळे मी कोअर कमिटीतूनही अंग काढून घेतले आहे. मी पराभूत झाले असले तरी काही आमदार देऊ शकले. पक्षासाठी सुमारे ३५० सभा घेतल्या. 

आमचे जीवन पक्षाला वाहिलेले आहे. आमच्या पक्षात राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे प्रथम राष्ट्रासाठी काम करणार आहे. व्यक्तीस्वातंत्र्य हा पक्षाचा गाभा आहे.

..तर शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, फडणवीसांचे वक्तव्य