पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला राज्यसभेची अपेक्षाही नव्हतीः एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कापल्याचे बोलले जात आहे. परंतु, खडसे यांनी मात्र आपल्याला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती आणि आपल्याला दिल्लीत रसही नसल्याचे म्हणत या विषयावर चर्चा बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

'प्रियांका चतुर्वेदींचं इंग्रजी चांगलं, म्हणून संधी मिळाली असेल'

भाजपने बुधवारी आपल्या तीन जागांपैकी दोन जागांचे उमेदवार जाहीर केले होते. यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले आणि रिपाइं नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असे बोलले जात होते. परंतु, अनपेक्षितपणे पक्षाने औरंगाबादचे नेते डॉ. भागवत कराड यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे खडसे यांच्याकडे पक्षाने पुन्हा दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते.

आता आठवले म्हणाले, गो.. महाविकास आघाडी गो...!

तथापि खडसे यांनी मात्र आपल्याला राज्यसभेची अपेक्षा नव्हती. मला राज्याच्या राजकारणात रस आहे. राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरु होती, ही गोष्ट खरी आहे, असे त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.

माझ्या घरात आधीच एक खासदार आहे. पक्ष योग्य तो निर्णयच घेत असतो, असेही ते म्हणाले.