पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी नेहमीच पंकजा यांच्या पाठिशी उभा राहिलोः देवेंद्र फडणवीस

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस

कोण काय बोललं याला मी महत्त्वही देणार नाही. मुख्यमंत्री असल्यामुळे मागील पाच वर्षे मी समोर येत होतो. त्यामुळे प्रसिद्धीही जास्त झाली. त्या काळात पक्षाने निवडणुकाही मोठ्याप्रमाणात जिंकल्या. जिंकल्यानंतर जसे हार घ्यावे लागतात. तसेच शिव्याही खाव्या लागतात. पंकजा मुंडे यांच्या पाठिशी मी नेहमीच उभा राहिलो. त्यांना कोअर कमिटीत घेतले. त्यांना महत्त्वाची मंत्रिमंडळे दिली. सभागृहातही धनंजय मुंडे त्यांना टार्गेट करत त्यावेळीही मी त्यांच्यामागे उभा होतो, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

जाहीर बोलणं खडसेंनी टाळायला हवं होतं- फडणवीस

मी कालही त्यांच्या पाठिशी होतो, आजही आहे आणि उद्याही राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. 

सभागृहात धनंजय मुंडेंनी पंकजांवर आरोप केले. तेव्हा मी स्वतः त्यांच्या मदतीला गेलो. धनंजय मुंडेंना भाजपची कधीच साथ नव्हती. पंकजा यांना मी चार दिवसांपूर्वी बोललो होतो. आता पुन्हा बोलेन.

..तर शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, फडणवीसांचे वक्तव्य

भाजप हा ओबीसींचा पक्ष आहे. सर्वाधिक ओबीसी भाजपत आहे. भाजप सरकारच्या काळातच ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली. त्यामुळे भाजपत ओबीसींवर अन्याय होतो, हे म्हणणे चुकीचे आहे.