पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फक्त दिवे बंद करा, इतर उपकरणं सुरु ठेवण्याचं महापारेषणचं आवाहन

वीज पुरवठा

नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला.  यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व वीजनिर्मिती केंद्र आणि वितरण कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. वीज पुरवठेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून राज्य भार प्रेषण केंद्रानं दिलेल्या सूचनांचे काटेकोरपण पालन करावे असं बजावण्यात आलं आहे. तसेच कोयना आणि टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!

दिवे बंद केल्यानंतर राज्यात सुमारे १७०० मेगावॅट विजेची मागणी घटणार आहे.  ९ मिनिटांनंतर पुन्हा विजेची मागणी वाढेल ती पूर्ण करण्यासाठी हे जलविद्युत प्रकल्प सज्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री केवळ दिवे बंद करावे घरातील इतर पंखे, टीव्ही सारखी उपकरणं मात्र सुरु ठेवावी असं आवाहन महापारेषणनं केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे मालवून घराबाहेर दिवा, मेणबत्ती लावण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेला अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी देशवासीयांना  दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइलचा फ्लॅश किंवा टॉर्च ऑन करण्याची विनंती केली आहे. मात्र यामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊ असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे नागरिकांनी दिवे न बंद करता केवळ लाईट व मेणबत्ती लावावी असंही त्यांनी सांगितलं होतं. 

कोविड-१९ : तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, ICMR कडून आवाहन

'लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची वीजपुरवठा मागणी ही २३ हजार मेगावॅटलवरुन १३ हजार मेगावॅटवर आली आहे. ही वीज घरघुती वापरासाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड फेल होतील. ग्रिड  कोसळून संपूर्ण राज्य अंधारात जाईल. एकदा पॉवर ग्रिड बंद झाल्यास त्याला पुन्हा कार्यान्वित करायला १२ ते १६ तास लागतात. जर सगळेच पॉवर स्टेशन बंद झाल्यास परिस्थीत  नियंत्रणात यायला १ आठवडा जाईल. यामुळे रुग्णालयांतील सेवाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे मोदींनी केलेल्या आवाहनाचा पूर्णपणे विचार व्हावा', असं राऊत म्हणाले. ट्विटरवर व्हिडिओ मेसेजद्वारे त्यांनी हे निवेदन दिले होते. नागरिकांनी करोना रुग्णांसह इतरांच्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वत:च्या घरचे दिवे, पंखे बंद करू नयेत, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले होते.