पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोलिस पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

डोंबिवली हत्या प्रकरण

परभणीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी शहरातील खानापूर भागात घडली. मृत पत्नी ही पोलिस असून कमल जाधव-माने (२५) असे तिचे नाव आहे. तर मृत पतीचे नाव कृष्णा माने (३०) आहे. 

राज्यपालांचा कमलनाथ सरकारला आदेश, उद्याच बहुमत चाचणी

कमल जाधव-माने या नानलपेठ पोलिस ठाण्यात कर्मचारी आहेत. कृष्णा हे शेती व्यवसाय करतात. कृष्णा व कमल यांच्यात शनिवारी दुपारी वाद झाला. त्याच वेळी कृष्णा याने पत्नी कमल हिच्या मानेवर, गळ्यावर व अंगावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कमल यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णा याने स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली.

CoronaVirus: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले

याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नींमध्ये यापूर्वीही सातत्याने वाद होत असत, असे सांगण्यात येते.