पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हत्या करुन पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले; पतीला अटक

पत्नीची हत्या करुन मृतदेह जाळला

सततच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. माजलगाव शहरातील अशोकनगर भागामध्ये ही घटना घडली आहे. अशोकनगर परिसरातील एका नाल्याजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मानवी सांगाडा आढळून आला होता. त्यावरुन पोलिसांनी तपास केला असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

भाजपला विरोध करणारा 'देशद्रोही' हा भ्रम : उद्धव ठाकरे

अशोकनगरमध्ये पतीनेच पत्नीची १० दिवसांपूर्वी हत्या केली होती. तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तिच्या कमरेखालचा भाग नाल्याजवळ जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातूनच ही घटना उघडकीस आली. रेश्मा साळवे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती संजय साळवे उर्फ अब्दुल रहमानला पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४ तासांत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

काश्मीरमधील स्थिती सामान्य पण काँग्रेसची..., अमित शहांचे प्रत्युत्तर

दरम्यान, पोलिसांनी फ्रीजमध्ये ठेवलेले मृतदेहाचे तुकडे जप्त करुन शवविच्छेदनासाठी पाठवले. संजय काहीच काम करत नसल्यामुळे रेश्मा आणि त्याच्यात सतत भांडण होत होते. २९ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये मोठे भांडण झाले त्यानंतर संजयने तिची सुऱ्याने हत्या केली. रेश्मा आणि संजय यांचा प्रेमविवाह होता. दोघांमध्ये सतत वाद होत होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

निर्भया प्रकरण: चारही दोषींना फासावर लटकवले जाणार?