पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुबईच्या हॉटेल व्यावसायिकाची शहापूरमध्ये हत्या

शहापूर हत्या प्रकरण

दुबईच्या हॉटेल व्यावसायिकाची ठाण्यामध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यामध्ये घडली आहे. मुंबईचा रहिवासी असलेल्या सुरेश मुनाजे (४८ वर्ष) यांची शहापूर येथील एका बंगल्यामध्ये हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते या बंगल्यामध्ये राहत होते. सुरेश यांचे दुबईमध्ये हॉटेल आहे. 

बेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टला पुन्हा संपावर जाणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुरेश मुनाजे बंगल्यामध्ये एकटे होते. त्याच दरम्यान, बंगल्याच्या खिडक्या तोडून काही अज्ञातांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला. या अज्ञातांनी कपड्यांनी सुरेश यांचे हात-पाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. 

वांद्र्यातील MTNL इमारतीला आग; ८४ कर्मचाऱ्यांना सुरक्षित 

शनिवारी सकाळी बंगल्यावर काम करणारे कर्मचारी आले असता त्यांना सुरेश यांची हत्या झाल्याचे समजले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरेश यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सुरेश यांच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या. त्यांचा मृतेदह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण; अभिनेता एजाज खानला जामीन