पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑनर किलिंग : गर्भवती मुलगी, जावयाला पेटवणाऱ्या वडिलांच्या शोधात पोलिस

ऑनर किलिंग महाराष्ट्र

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी आपली मुलीला जाळून मारल्याचा आणि जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता अहमदनगर पोलिस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत. या कृत्यामध्ये आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये ही घटना घडली. एक मे रोजी संबंधित वडिलांनी मुलगी आणि जावयाच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जाळून टाकले. यावेळी त्याचे दोन्ही भाऊ तिथे उपस्थित होते. त्यांनीही यासाठी संबंधित वडिलांना मदत केली. रामा भारतीय असे आरोपीचे नाव आहे. 

सहा महिन्यांपूर्वी त्याची मुलगी रुख्मिणी हिने मंगेश रणसिंग याच्याशी आंतरजातीय विवाह केला. तेव्हापासून रामा भारतीय आणि त्याचे नातेवाईक या विवाहाच्या विरुद्ध होते. रुख्मिणी ही दोन महिन्यांची गर्भवती असतानाच रामाने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यामध्ये गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर या घटनेत मंगेश जखमी झाला आहे. 

उच्चभ्रू आरोपींसाठी आर्थर रोड कारागृहात नवी बराक

पोलिसांनी रामा भारतीयचे भाऊ सुरेंद्र आणि घनश्याम सरोज यांना अटक केली आहे. रामा हा फरार आहे. त्यांच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक विजयकुमार बोत्रे म्हणाले, मंगेश रणसिंग हा लोहार समाजातील आहे. तर रुख्मिणी ही पासी समाजातील होती. एक मे रोजी ही घटना रामा भारतीय याच्या घरीच घडली. नवऱ्यासोबत किरकोळ वाद झाला म्हणून रुख्मिणी वडिलांकडे राहायला आली होती. मंगेश तिला घेण्यासाठी घरी आल्यावर रुख्मिणीचे कुटुंबीय आणि या जोडप्यामध्ये वाद झाले. याचवेळी रागातून रामाने दोघांच्या अंगावर केरोसिन टाकून आग लावली. खोलीतून धूर आणि आरडाओरडा ऐकू आल्यावर शेजारचे धावत आले आणि त्यांनी आग विझवली. यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुख्मिणीने ससून रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. तर मंगेश या घटनेत ४० टक्के भाजला आहे. 

रहस्य उलगडलं: रोहित शेखरचा गळा दाबून खून, पत्नी अपूर्वा शुक्लाला अटक

रुख्मिणीने तिच्या अखेरच्या जबाबात वडील आणि दोन्ही काकाच या घटनेला जबाबदार आहेत, असे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.