पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण; पतीनेच पत्नीला पेटवले?

पारनेर ऑनर किलिंग (मंगेश रणसिंग पत्नी रुक्मिणीबरोबर)

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलीला जाळून मारल्याचा आणि जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील निघोज (ता.पारनेर) येथे उघडकीस आला होता. हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिस चौकशीत सुकृतदर्शनी पती मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे समोर येत आहे. 

ऑनर किलिंग : गर्भवती मुलगी, जावयाला पेटवणाऱ्या वडिलांच्या शोधात पोलिस

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे, रुक्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. हा ऑनर किलिंगचा प्रकार नसून मंगेशनेच रुक्मिणीला पेटवले असावे, या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश व रुक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहाला दोघांच्याही कुटुंबांचा विरोध नव्हता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंगेशने रुक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. 

उच्चभ्रू आरोपींसाठी आर्थर रोड कारागृहात नवी बराक

रुक्मिणीने मृत्यूपूर्व जबाबात मंगेश व मला वडील, मामा व काकांनी पेटवून दिल्याचे सांगितले होते. मात्र, रुग्णालयात मंगेशच्या बहिणीने रुक्मिणीच्या आईसह नातेवाइकांना रुक्मिणीला भेटू दिले नाही, ही बाब पुढे आली आहे.