पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एप्रिल फूलच्या नावाखाली अफवा पसरवली तर कारवाई करणार: गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

'लॉकडाऊन असताना एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा केली आणि अफवा पसरवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. कोरोना विषाणूचे वाढते संकट आणि लॉकडाऊन यामध्ये कोणीही कोरोनासंबंधित कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारे आणि लोकांमध्ये संभ्रम नर्माण करणारे मॅसेज टाकू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. 

धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस

गृहमंत्र्यांनी सांगितले की, '१ एप्रिल दिवशी सर्व जण दरवर्षी आपल्या सहकारी, मित्रांची एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टा करतात. मात्र आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणी एप्रिलफूलच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चेष्टा करु नये. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. याबाबतील कोणी सहकार्य करणार नाही किंवा अफवा पसरवेल. तर त्याच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, प्रवास करु नका असे वारंवार आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा अनेक जण सरकारने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे विनंती करुनही सहकार्य करत नाही अशांवर लाठीचा वापर करा, असे गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले आहे. 

व्हा सावध!, पीएम केअर्स फंडच्या नावाने बनावट वेबसाइट सक्रिय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister anil deshmukh warns people against sending prank messages related to covid-19 on april fools day