पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सहकार्य करत नाही त्यांच्यावर लाठीचा वापर करा : गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. तरी सुद्धा अनेक लोकं मोठ्यासंख्येने घराबाहेर पडत आहे. 'शब्दांची भाषा आता संपली. सहकार्य करत नाही त्यांच्यावर लाठीचा वापर करा.', असे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

अधिक जगण्यासाठी थोडी शैली बदलू : उद्धव ठाकरे

गेल्या ८ दिवसांपासून सरकारकडून नागरिकांना वारंवार घरा बाहेर पडू नका, काळजी घ्या, गर्दी टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील ९० टक्के जनता सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत आहे. मात्र अद्याप काही लोकांना या परिस्थितीचे गांभीर्य नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. राज्यामध्ये भाजीपाला, दूध, धान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

अखेर ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी स्थगित

दरम्यान, राज्यामध्ये अनेक ठिकाणी काळाबाजार केला जात आहे. त्याचसोबत अन्नधान्य जादा दराने विकले जात आहे. अशा दुकानदारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात देखील कारवाई केली जाईल. तसंच, राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. ज्यांची शिक्षा ५ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्याबाबत सरकार लवकर निर्णय घेईल, असे देखील गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.