पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरोपीला सुध्दा जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी

घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये मोर्चा

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेप्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या मुलीला जसे जाळले तसेच आरोपीला सुध्दा पेट्रोल टाकून जिवंत जाळा. तिला ज्या वेदना झाल्या त्या त्याला सुध्दा झाल्या पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली. तर, हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचे ज्या पध्दतीने पोलिसांनी एन्काऊंटर केले तसेच या आरोपीचे सुध्दा एन्काऊंटर करा, अशी मागणी पीडितेच्या मामाने केली आहे.

निर्भया प्रकरण : फाशीची लवकर अंमलबजावणी करा, राज्यसभेचे निर्देश

याप्रकरणातील आरोपी विक्की नगराळेला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. तर, पीडितेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तसंच, याप्रकरणी हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. वर्ध्यात प्रांत कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. 

यवतमाळ निवडणूक: महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

दरम्यान, २४ वर्षीय पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. सोमवारी हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये ती बसमधून उतरली. त्याठिकाणावरुन ती महाविद्यालयाकडे चालत जात होती. त्याच दरम्यान आरोपी दुचाकीवरुन मित्रासोबत आला. त्याने दुचाकीमधून एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल काढले आणि तरुणीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. पोलिसांनी आरोपीला नागपूर येथून अटक केली. आरोपी पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. पीडित तरुणी आणि तो एकाच गावात राहतात. 

'जगात शिक्षणाला पदवी लागते, कलेसाठी पदवीची गरज नाही'