'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. जो त्रास माझ्या मुलीला झाला तो आरोपीला झाला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया हिंणघाट प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसंच, न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही. आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, असा पवित्रा पीडितेचे कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गेल्या ७ दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.
हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. पीडितेच्या आईला मानसिक धक्का बसला आहे. तर संतप्त झालेल्या पीडितेच्या वडिलांनी आरोपीला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. माझ्या मुलीला जो त्रास झाला तो आरोपीला सुध्दा झाला पाहिजे. निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखे नको तर लवकर लवकर मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. तसंच, न्याय मिळत नाही तोपर्यंत तिचा मृतदेह स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. तर, आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ठेकेदाराची केली हत्या
दरम्यान, पीडितेच्या शरिरामध्ये इन्फेक्शन वाढले होते. त्यामुळे काल रात्रीपासून तिचा रक्तदाब खालावला होता. औषधं देऊन तिच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिचे हृदय दोन वेळा बंद पडले. इन्फेक्शनमुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसंच, पीडित तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुपारी पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.