पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

हिंगणघाट तरुणीला जिवंत जाळले

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या ७ दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरु होती. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काल रात्रीपासून उपचारा दरम्यान पीडितेचे हृदय दोन वेळा बंद पडले होते. हृदयविकाराचा धक्का बसल्याने तिची प्रकृती खालावली. तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ठेकेदाराची केली हत्या

ऑरेंजसिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडितेच्या शरिरामध्ये इन्फेक्शन वाढले होते. ७ फेब्रुवारीपासून ती व्हेंटिलेटरवर होती. तिचा रक्तदाब वर-खाली होत होता. काल रात्रीपासून तिचा रक्तदाब खूप खालावला होता. औषधं देऊन तिच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिचे हृदय दोन वेळा बंद पडले. इन्फेक्शनमुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम झाला होता. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाला.' पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान, २४ तासांनतर निवडणूक आयोगाची माहिती

दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीला आरोपी विक्की नगराळे याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये पीडित तरुणी ४० टक्के भाजली होती. गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर नागपूच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर येथून आरोपीला अटक केली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर ऑरेंजसिटी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

... तर यापुढं तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ, राज ठाकरेंचा इशारा