पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

आरोपी विकेश

हिंगणघाट प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी विकेशला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला  न्यायालयीन कोठडीत पाठवताना पुढे गरज पडल्यास पोलीस कोठडी मागू, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून आरोपीला सकाळी ६ च्या आधीच न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट 

हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीच्या शरिरात इन्फेक्शन होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम या प्रकरणातील पीडितेची बाजू कोर्टात मांडणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान, ७० जागेसाठी ६७२ उमेदवार

हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. सोमवारी ती कामासाठी निघाली होती. हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये उतरुन त्याठिकाणावरुन ती महाविद्यालयाकडे चालत जात होती. त्याच दरम्यान आरोपी विकेश मित्रासोबत दुचाकीवरुन आला. त्याने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. पोलिसांनी आरोपी विकेशला नागपूर येथून अटक केली होती. 

नवी मुंबईतील टॉवरची आग विझवताना ७ जवान जखमी