पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरण: पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला मिळणार सरकारी नोकरी

संतप्त गावकऱ्यांचे आंदोलन

हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरोडा गावातील पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. मात्र पीडित तरुणीच्या वडिलांशी गृहमंत्र्यांनी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी मृतदेह स्वीकार करण्यास तयारी दाखवली. दरम्यान, गृहमंत्र्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबातील एका व्यक्तिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तर, पीडित तरुणीचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

SC/ST कायद्यातील सुधारणा वैध, तक्रारीनंतर चौकशीआधी अटक शक्य

नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पीडित तरुणीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पीडितेचा मृतदेह घेऊन ते हिंगणघाटच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी पीडितेच्या मृतदेहावर दारोडा गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर दरोडा गावातील ग्रावकरी संतप्त झाले आहेत. संतप्त गावकऱ्यांनी नागपूर-हैद्राबाद जुना महामार्ग रोखून धरला. महामार्गावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे. 

'मी भारतातच राहणार पण कोणताही पुरावा दाखवणार नाही'

दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीला आरोपी विक्की नगराळे याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये पीडित तरुणी ४० टक्के भाजली होती. गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर नागपूच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर येथून आरोपीला अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी