पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे यानं नागपूर मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सहकारी कैद्यांनी आरडओरड केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. 

मुंबईतल्या चार पंचतारांकित हॉटेल्सनां बॉम्बनं उडवण्याची धमकी

३ फेब्रुवारी रोजी आरोपी विक्की नगराळे यांने पीडित तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित तरुणी ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे.

जर्मनीमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू

विक्की नगराळे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी विक्कीला आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर करणार आहे.