पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी 'राम मंदिर ट्रस्ट'च्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी केली. त्यानंतर नागपूरमध्ये प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली.

 

योगी सरकारने मशिदीसाठी अयोध्येजवळ दिली ५ एकर जागा

प्रवीण तोगडिया यांनी असे सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण त्यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांना सुध्दा भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, अयोध्येतील राममंदिर आंदोलनात महत्वाचा सहभाग असलेल्या विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महंत रामचंद्र परमहंस, महंत अवैद्यनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा, असे तोगडिया यांनी सांगितले. 

महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी स्पष्ट भूमिका  घेतली होती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही. राम मंदिर आंदोलनाला नेतृत्व देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. 

जन्मल्यानंतर ३० तासांत बाळालाही कोरोनाची लागण